Thursday, January 15, 2009

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचयरोज
सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हानायाचायानाव्या
वहिचा वास घेत पहिल्या पानावरछान अक्षरात आपल नाव लिहायचायमला
पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
.मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुननलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्याचिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचयसायकलच्या
चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
घन्टा व्हायची वाट का असेनामित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षादप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचयमला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
"बालपण देगा देवा" या तुकारामान्च्या अभन्गाचा अर्थआता थोडा कळायला लागलाय,
तो बरोबर आहे ना.. हे विचारयला...
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय ...

No comments: