Monday, January 12, 2009

आठवणी.

आठवणी.......
काही गोष्टिंच असच असत
मनात अठवनिंच जाळ असत
त्यात काहींना विसरायच असत
पण विसरण मात्र जमत नसत

आमच्या आयुष्यातून त्यांना जायचच असत
आणि त्यांच्या आठवणीना आम्हाला छळआयाच असत

अठवनिंच कस असत
रात्रि लुकलुकनाऱ्या ताऱ्यासारखं असत
लांब असले तरी पण मनात जवळच स्थान असत

अठवनिंच कस असत
पावसाच्या टोचनाऱ्या थेम्बानसारख असत
भिजन आपण सोडत नाही कारण टोचन ही आपल्याला हवहवसच असत

आठवणीना चित्रात रेखाटायच असत
तर कधी कवितेत कोरयाच असत
गर्दी मध्ये एकट्या जगनाऱ्या माझ्यासाठी
हे नातं अधाराचच असत

अठवनिंच महत्व तुम्हाला काय कळनार
त्यांना विचारा
ज्यांना आठवणीच्या आधारावर
आयुष्यभर जगायच असत .

Wednesday, December 24, 2008

मराठा

मी मराठा आहे!होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला". दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत. इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.आणि हे बदलण्याची ताकत आहे "मराठयांच्या मनगटात"...

Friday, July 20, 2007

मन....

मन.....
मन..किती महान रहस्यं लपलेली असतात फक्त या दोन अक्षरी शब्दात ! खरंच काय आहे हे मन म्हणजे ?जगातील प्रत्येक माणूस म्हणजे मनोभावनांच्या असंख्य दोरखंडांशी जखडलेला एक हत्तीच नसतो काय? जिथल्या तिथं एकसारखा हलणारा ! अस्वस्थ ! तरीही स्वत:ला स्वतंत्र आणि सामर्थ्यवान समजणारा ! आणि ज्याला 'मन,मन' म्हणतात ते म्हणजे तरी दुसरं-तिसरं काय आहे? तो एक खेकडाच नसतो काय? किती असंख्य भावनांच्या नांग्या असतात त्याला! वळवळणा-या, आपली तीक्ष्ण टोकं आसपासच्या वाळूत रुतविणा-या !तरीही एकमेकींना आधार देत देत मधल्या देहाचं ओझं तसंच पुढं पुढं ओढणा-या !माणसाच्या भाव-भावना अशाच नाहीत काय? प्रेम,द्वेष,त्याग,लोभ,स्नेह,तिरस्कार,ममता,क्रोध सगळ्या सगळ्या त्या मानाच्या नांग्या! स्वत:च्या क्षेत्रात हव्या तशा वळवळणा-या ! तरीही देहाला पुढं पुढं सावरीत नेऊ पाहणा-या !कुठं ? ते मात्र कुणालाच सांगता येत नाही !